व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना ऊस विकास विभाग देणार इंटर्नशीप

लखनौ : कार्यालये आणि औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर प्रदेश ऊस विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना रोजगारपूरक शिक्षण आणि अनुभव देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना विभागाच्या वेबसाईटवर upcane.gov.in जावून अर्ज करावा लागेल.

याबाबत साखर उद्योग आणि ऊस विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, अशा प्रशिक्षणासाठी जे व्यावसायीक अभ्यासक्रम, स्नातक अथवा संबंधित विषयासाठी कोणत्याही सेमिस्टरमध्ये जे शिक्षण घेत आहेत अथवा ज्यांनी यापूर्वीच्या सेमिस्टरमध्ये ५५ टक्के गुण मिळवले आहेत, त्यांच्यासाठी इंटर्नशीप आणि अप्रेंटीसशीप सुरू करण्यात आली आहे. दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार या कार्यक्रमात कृषी, लेखा, विधी, कम्प्युटर, शर्करा तंत्र, अभियांत्रिकी, मानव संसाधन, सांख्यिकी आणि औद्योगिक प्रशिक्षणाचा समावेश आहे. यासाठी इच्छुक असलेल्यांना ऊस विकास आणि साखर उद्योग विभाग, उत्तर प्रदेशच्या वेबसाईटवर जावून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करावी लागेल. प्रशिक्षण घेऊन त्यांना भविष्यात रोजगार मिळावा यासाठी कुशल, अनुभवी बनविण्यासाठी हे प्रयत्न आहेत. संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, इंटर्नशीप २१, ३० आणि ६० दिवसांची असेल. अप्रेंटिसशीप एक वर्षात पूर्ण केली जाईल. प्रशिक्षणासाठी किमान ९० दिवसांची उपस्थिती अनिवार्य आहे. प्रशिक्षणासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांनी सरकारी कार्यालयातील गोपनियता राखण्याबाबत घोषणापत्र देणे अनिवार्य आहे. अप्रेंटिसशीप संपल्यानंतर प्रत्येकाने स्वयं मुल्यांकन अहवाल सादर करावा लागेल. त्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांना संबंधीत संस्थांकडून प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here