अमरोहा : ऊस पिकावर पोक्का बोईंगसह इतर रोगांचा फैलाव होवू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक नष्ट होण्याची भीती सतावत आहे. रोगामुळे उसाची वाढ खुंटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, ऊस पिकावर अनेकवेळा किटकनाशकांची फवारणी करण्यात आली. मात्र, त्यामुळे पोक्का बोईंग रोगाचा फैलाव कमी झालेला नाही. या रोगामुळे उसाची वाढ खुंटत आहे. उसाची पाने पिवळी व पांढरी पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कृषी विभागाने याची पाहणी करावी आणि त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना सूचवावी. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, उसाच्या पाहणीसाठी पथके पाठवण्यात येत आहेत. रोगाला आळा घालण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा ऊस अधिकारी मनोज कुमार यांनी दिली.