बुलंदशहर : केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे सचिव संजीव चोप्रा यांनी साबितगड येथील त्रिवेणी साखर कारखान्याच्या साखर आणि डिस्टिलरी युनिटची तपासणी केली. मंगळवारी श कारखान्याच्या आवारात केंद्रीय सचिवांना कारखान्याच्यावतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तानुसार, कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सचिव चोप्रा यांनी कारखान्याची पाहणी केली. यार्डला भेट देऊन उसापासून साखर तयार करण्याच्या प्रक्रियेचे निरीक्षण केले. नंतर डिस्टिलरी युनिटमध्ये जाऊन इथेनॉल उत्पादन प्रक्रियेची सखोल तपासणी केली. यावेळी उप जिल्हाधिकारी लवी त्रिपाठी आणि कारखान्याचे सरव्यवस्थापक (साखर) प्रदीप खंडेलवाल, प्रमोद कुमार आणि इतर उपस्थित होते. सचिवांनी साखर कारखान्याच्या कार्यक्षमतेवर, झिरो लिक्विड डिस्चार्ज, बायोगॅस प्रोग्राम आणि इथेनॉल बिल्डिंग प्रोग्रामवर समाधान व्यक्त केले. डिस्टिलरीची इथेनॉल उत्पादन क्षमता आणि उत्तम सुरक्षा व्यवस्था याचे त्यांनी कौतुक केले. दिनेश चहल, नवीन अग्रवाल, संजय मिश्रा, सज्जन पाल सिंग आदी उपस्थित होते.