साखर ₹2900 ऐवजी ₹3200 रुपये कायम हवी होती

एफआरपीसह कर्जही दिली असती.
कोल्हापूर, दि. 7 मे 2018 : केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी 8500 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये 1540 कोटी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी तसेच इतर देणी दिली जाणार आहे, मात्र साखरेचे प्रतिक्विंटलचे दर 2900 रुपयांच्या खाली येऊ देऊ नये असे नमूद केले आहे. याच साखरेचा ₹2900 ऐवजी ₹3200 रुपये दर कायम ठेवला असता तर कारखान्यांकडून एफ आर पी आणि कर्जही भागवता आले असते.
कोल्हापुरमध्ये सरकारच्या पॅकेजचे काहीनी स्वागत केले जात आहे. तर, काही लोकप्रतिनिधींनी याचा शेतकऱ्यांना काडीचाही फायदा नसल्याचे सांगत आहेत. दरम्यान, या निर्णयासोबत एफआरपी घोषित करताना साखरेचे दर खाली येवू नयेत याचीही काळजी घेण्याबाबत निर्णय झाला पाहिजे होता, अशी अपेक्षा शेतकरी, साखर कारखानदार व तज्ञांकडून होत आहे.
केंद्र सरकारने उसाला दर देण्यासाठी कायदा केला आहे. कायदा करताना प्रतिक्विंटल साखरेचे दर ₹3400 ते ₹3500 रुपये होते. चांगल्या दरामुळे साखर हंगामात गाळप झालेल्या उसाला एफआरपीची ठरलेली रक्कम देण्यास मदत झाली. मात्र, काहीच दिवसात या दराचा आलेख कोसळला. कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना एफआरपी देता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह साखर कारखानदारांचे गणितही बिघडले. केंद्र सरकारने साखरेला जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये समाविष्ठ केले आहे. याचा फटका थेट शेतकरी आणि कारखानदारांना बसत आहे. पॅकेज जाहीर करण्याआधीही सरकारने प्रतिक्विंटलचे दर ₹2900 पेक्षा कमी येवू नये, अशा सूचना दिल्या आहेत. वास्तविक हिच साखर एफआरपी ठरवताना होती तेवढी तरी असायला पाहिजे होती. सुरूवातीलपासून जो दर होता तोच दर राहिला असता तर केंद्र सरकारपूढेही येवढा मोठा प्रश्‍न आला नसता. कारखान्यांना जाहीर झालेल्या पॅकेजमधून दिलासा मिळाला आहे. याच पॅकेजचा विचार करताना एफआरपी किंवा शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी घेतलेल्या जून्या कर्जांबाबतही विचार केला पाहिजे होता. जुनी कर्जांना काही वर्षा हप्ते पाडून दिले असते, तर कारखान्यांपुढील समस्या काहीअंशी कमी झाली असती, असे चित्र आहे. इथेनॉल काढणाऱ्यांसाठी हे पॅकेज फायद्याचे आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात इथेनॉल प्रकल्प कमी आहेत. त्यामुळे, साखरेचा दर 3200 रुपये झाला असता तर एफआरपी देणे शक्‍य होते. आता मात्र एफआरपी देण्यात साखर कारखानदारांसमोर मोठे संकट आहे. यापूर्वीच एफआरपी देण्यासाठी घेतलेली कर्ज आणि टर्म लोनसाठी हप्ते पाडून दिले असते कारखाने शॉर्ट मार्जिनमधून बाहेर येण्यास मदत झाली असती.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here