ढाका : शहरातील बाजारपेठांमध्ये आठवडाभरात साखरेच्या किमती Tk११५ प्रती किलोग्रॅमपेक्षा अधिक झाल्या आहेत. साखरेच्या वाढत्या किमतीमुळे देशातील सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. स्थानिक बाजारपेठेत गेल्या एक महिन्यापासून साखरेच्या किमतीमध्ये सातत्याने तेजी दिसून येत आहे. देशातील शुगर रिफायनरींच्या मागणीनुसार, सरकारने ६ ऑक्टोबर रोजी साखरेच्या किमतीमध्ये Tk६ प्रती किलोग्रॅमची वाढ केली होती.
दरम्यान, वाणिज्य मंत्रालयाने साखरेच्या किमती रिफायनरींच्या मागणीनुसार निश्चित केल्या. मात्र, व्यापाऱ्यांनी सरकारकडून निश्चित केलेल्या किमतींचे पालन केलेले नाही. राष्ट्रीय ग्राहक अधिकार संरक्षण संचालनालयाला अलिकडे आढळून आले होते की, बहुतांश शुगर रिफायनरींनी आपल्या उत्पादनात जवळपास ५० टक्क्यांची कपात केली आहे. आणि सरकारकडून निर्धारीत केलेल्या दराच्या तुलनेत साखरेचे कारखान्यातील विक्रीचे दर उच्च स्तरावर आहेत. बांगलादेश व्यापार महामंडळानुसार, साखरेच्या किमतींमध्ये एका महिन्यात २६.४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. शुक्रवारी शहरातील बाजारपेठेत याची विक्री Tk११५ प्रती किलोग्रॅम या दराने सुरू होती.