पुणे: महाराष्ट्राच्या बीड आणि परभणी येथील जवळपास 190 ऊसतोड मजूर कोरोनामुळे तमिलनाडु मध्ये आडकले आहेत आणि आपल्या घरी जाण्याची वाट पाहात आहेत. या मजुरांनी राज्य सरकारकडे मदतीची याचना केली आहे.
ऊस तोड मजूर नीलाबाई राठोड़ यांनी सांगितले की, आम्ही जवळपास दोन महिन्यांपासून इथे अडकलो आहोत. मला माझ्या मुलांबरोबर राहण्यासाठी घरी जायचे आहे. महाराष्ट्र सरकारने आम्हाला पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही केली.
राठोड या तामिळनाडूत अडकलेल्या बीड आणि परभणी तील १९० मजुरांपैकी एक आहे. हे सर्व तामिळनाडूतील अरियालुर जिल्ह्यातील कीजफापालुर गावात आडकले आहेत. इथे मजुर ऊस तोडणीसाठी आले होते.
यापूर्वी दुसऱ्या जिल्ह्यांंमध्ये अडकलेल्या मजुरांना मेडिकल चेकअप नंतर सरकारने आपल्या घरी सोडले होते आणि सर्व लोक जवळपास आपल्या गावात पोचलेही आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.