नैरोबी (केनिया): भारतात दुसरा ऊस गाळप हंगाम सुरू होण्याची वेळ आली तरी, अनेक साखर कारखान्यांकडे ऊस बिले थकीत आहेत तसेच साखर कामगारांचे पगारही थकले आहेत. तशीच परिस्थिती इतर देशांमध्ये आहे. केनियामध्ये साखर कारखान्यांतील कामगारांचे २७.२ मिलियन डॉलर थकीत आहेत. केनियातील सोनी, चेमीलील, मुहोरोनी, मुमैस आणि न्झोइआ या साखर कारखान्यांकडून कामगारांचे पगार थकले आहेत.
संसदेच्या मनुष्यबळ आणि सामाज कल्याण विभागाच्या सदस्यांनी ९ आणि १० ऑगस्ट रोजी काही साखर कारखान्यांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या तक्रारी ऐकल्यानंतर त्यांच्या पगाराच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे आदेश दिले समिती सदस्य डेव्हिड सँगोक म्हणाले, ‘कामगारांचे थकीत पगार देण्याची आम्ही ग्वाही देतो.’ ओनयान्गो कोय्यो म्हणाले, ‘आमचा कारखान्यांच्या खासगीकरणाचा कोणताही उद्देश नाही. पण, चुका दुरुस्त व्हायला हव्यात. कायद्याचे पालन केले पाहिजे. साखर कारखाने बंद करणे किंवा विकायला काढणे हा सहज सोपा पर्याय आहे.’
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.