पाकिस्तान मधील साखर संकट अधिकच वाढले

पाकिस्तान : गव्हाच्या पिटाच्या कमतरतेमुळे शेतमालाचे भाव वाढले आहेत. तसेच साखरेच्या कमतरतेमुळे साखरेच्या दरातही वाढ होण्याचे संकट ओढवले आहे. पाकिस्तानी पाकगृहात आवश्यक असणार्‍या साखरेने गेल्या 1 आठवड्यात 10 रुपये प्रती किलोची वाढ नोंद केली आहे. साखरेचा घाउक दर 64 रुपयांवरुन 74 रुपये प्रति किलो झाला आहे. यामुळे देशात साखरेची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे.

सट्टा माफियांनी साखरेच्या दरात वाढ केल्याचा दावा साखर व्यापारी संघटनेच्या अधिकार्‍यांनी केला आहे. लाहोरमध्ये साखर प्रति किलो 80 रुपये दराने विक्री केली जात असल्याने, सर्वसामान्यांना साखर खरेदी करणे कठीण झाले आहे.

साखरेचे दर प्रतिकिलो 64 रुपयांपर्यंत वाढले आहेत. कराचीच्या घाउक व्यापार्‍यांचा असा दावा आहे की, साखर बॅगचा दर प्रति किलो आठ ते दहा रुपयांनी वाढला आहे. शहरात 100 किलो साखरेच्या एका पोत्याची किंमत 300 रुपयांनी वाढली आहे.

यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here