इस्लामाबाद : पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे (पीएमएल-एन) अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी महागाईबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पीटीआय सरकारवर जोरदार टीका केली आहे. देश साखरेच्या संकटातून मार्गक्रमण करीत आहे. सध्याचा साखरसाठा फक्त १५ दिवसांसाठी पुरेसा होईल असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोर आपल्या भाषणाशिवाय इतर काहीही देण्यासारखे नाही अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, साखरेच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दर चढे आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलेल्या मदतीच्या पॅकेजबाबत टीका करताना शाहबाज शरीफ यांनी मदत आणि पीटीआय हे दोन्ही वेगवेगळी टोके आहेत, असे म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे (पीपीपी) नेते सईद गनी यांनी सांगितले की, साखरेचा दर सातत्याने वाढत आहे. बुधवारी इम्रान खान यांनी १२० अब्ज रुपयांच्या देशातील सर्वात मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषण केली. त्यामध्ये महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी लोकांना मदत व्हावी यासाठी तूप, आटा आणि डाळींवर ३० टक्क्यांची सूट देण्यात आळी आहे. खान यांच्या घोषणेनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हे मदत पॅकेज म्हणजे सरकारच्या अपयशाची कबुली आहे अशी टीका केली. सरकारने सर्वांची थट्टा उडवल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षांनी दिली. जियो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार ट्वीटरवर पीपीपीचे बिलावल भुट्टो-झरदारी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांचे पॅकेज २० कोटी लोकसंख्येसाठी खूपच अपुरे आहे.