साखरेची मागणी अन् दरही वाढला

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

नवी दिल्ली : चीनीमंडी

महाराष्ट्र आणि देशात तापमान खूप वाढलंय. फनी वादळामुळं त्यात थोडी घट झाली असली तरी, अजूनही जवळपास एक महिना उन्हाचा तडाखा राहण्याची चिन्हे आहेत. या असह्य उकाड्यात साखर उद्योगाला मात्र चांगले दिवस आले आहेत. उकाड्यामुळे देशांतर्गत बाजारात साखरेची मागणी वाढली आहे. त्याचवेळी साखरेचा दर २० रुपये प्रति क्विंटलने वाढला आहे. एम ग्रेडसाठी 3,130-3150 रुपये प्रति क्विंटल आणि एस ग्रेडसाठी रु. 3,100 वर किंमतींनी 20 रुपये प्रति क्विंटलची वाढ केली आहे. त्याआधी किंमत 3,100 रुपये 3,110 रुपये प्रति क्विंटल होती. साखर कारखान्यांनाची ही एक आत्मविश्वास आला आहे कारण, एप्रिलसाठी जाहीर झालेल्या कोट्याची जवळपास सगळी साखर कारखान्यांनी विकली आहे आणि साखरेची मागणी अजूनही वाढत आहे. चालू महिन्यात साखर कारखान्यांना खुल्या बाजारात २१ लाख टन साखर विकता येईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. एप्रिल महिन्यासाठी हा कोटा १८ लाख टन होता.

याबाबत बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएसनचे सरचिटणीस मुकेश कुवेदिया म्हणाले, ‘लग्नाचा हंगाम आणि उकाड्यामुळे शीतपेयांना वाढलेली मागणी याचा परिणाम साखरेच्या मागणीवर झाला आहे. या महिन्यासाठी जाहीर झालेला साखरेचा विक्री कोटा पूर्ण होण्यात कोणतिही अडचण येणार नाही, असे दिसते. मार्च महिन्यासाठी (२४.५ लाख टन) सरकारने जादा कोटा जाहीर केला होता. ती परिस्थिती आणि सध्याची स्थिती वेगळी आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहिली तर उन्हाळ्याच्या महिन्यात सरासरी २०.५० लाख टन साखर विक्री होते. गेल्या वर्षी मे महिन्यात मासिक विक्री कोटा सिस्टम नव्हती. त्यावेळी सुमारे ३० लाख टन साखर विक्री गेल्याची माहिती आहे. त्यावेळी सरकार साखरेवर किमान आधारभूत किंमत लावणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने साखरेची विक्री झाली होती. कारण, व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर साखर खरेदी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here