साखर कारखान्यांकडून आतापर्यंत ४५-५० लाख टन साखर निर्यातीचे करार

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (ISMA) म्हणण्यानुसार, या हंगामात एक ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत साखर उत्पादन ५ टक्के वाढून ८२.१ लाख टन झाले आहे. तर २०२१-२२ या हंगामात या कालावधीत ७७.९ लाख टन उत्पादन झाले होते. साखर निर्यातीसाठी जवळपास ४५-५० लाख टनाचे करार नोंदविण्यात आले आहेत. यापैकी ६ लाख टन साखर निर्यात करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये ८-९ लाख टन साखर निर्यात केली जाईल. त्यामुळे या महिनाअखेर एकूण निर्यात १५ लाख टन होईल.

भारताने २०२१-२२ या हंगामात उच्चांकी १११ लाख टन साखर निर्यात झाली आहे. केंद्र सरकारने सद्यस्थितीत, २०२२-२३ मध्ये ६० लाख टन साखरेची निर्यात मंजूरी दिली आहे. २०२२-२३ हंगामात भारताने एकूण साखर उत्पादन सर्वाधिक ४१० लाख टन (इथेनॉलकडे वळविण्यापूर्वी) होईल अशी अपेक्षा आहे. इथेनॉलच्या उत्पादनासाठी सध्याच्या हंगामात ४५ लाख टन साखर डायव्हर्शन केले जाईल अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here