साओ पाउलो : ब्राझीलमध्ये 610,000 पेक्षा अधिक कोरोनाची प्रकरणे आहेत. कोरोना च्या बाबतीत बाजील देशातील दोन नंबरचा देश आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाचा परिणाम ब्राझीलच्या सैंटोस बंदरावर झाला आहे. यामुळे ब्राझीलच्या 70 पेक्षा अधिक जहाजात साखर लोड केल्यानंतर निर्यातीसाठी रांगेत उभे आहेत.
ब्राझीलमध्ये तीन वाहक कोरोनाग्रस्त आढळल्याने बंदरावर लोडिंग ऑपरेशनबंद करण्यात आले होते आणि लॅटिन अमेरिकेचे सर्वात मोठे बंदर सैंटोस मध्ये 14 दिवसांसाठी क्वारंटाईनचा सामना करावा लागला होता. पासानागुआ बंदरामध्येही ही समस्या होती. कोरोना वायरसमुळे निर्यातीची समस्या अधिकच जटिल झाली आहे.
कोरोना आणि लॉकडाउनमुळे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. अनेक लोक घरात बंद आहेत. वाहतुक ठप्प आहे. ज्यामुळे इथेनॉल च्या मागणीमध्ये घट झाली आहे. आणि यामुळे ब्राझीलने या हंगामामध्ये इथेनॉलऐवजी साखर उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.