कोल्हापूर, दि. 26 : साखर कारखान्यांनी बँकांकडे माल तारण ठेवलेला लाखो टनाचा साखर साठा हा निर्यातीसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी साखर कारखाना प्रतिनिधींनी केंद्र सरकारकड़े केली आहे.
बँकांकडे तारण असणारी साखर जर निर्यात झाली तर कारखान्यांना त्याचा मोठा फायदा होईल. तसेच बँकांची देणेही तत्काळ देता येतील. देशात सुमारे 18 हजार कोटींची एस आर पी देणे बाकी आहे. वेळेत साखर निर्यात झाली तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो याचा सारासार विचार करून सरकारने बँकांकडील असणाऱ्या साखर निर्यातीसाठी उपलब्ध करून दिली पाहिजे. याशिवाय बँकांकडून होणाऱ्या अर्थ पुरवठ्यातील अडचणी सांगून नाबार्ड व संबंधित बँकांना आदेश देऊन त्यातील अडचणी दूर करण्याच्या सूचनाही यावेळी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्या.