मुंबई : सलग दुसऱ्यांदा साखर हंगामात चांगली साखर निर्यात सुरू असून इथेनॉल उत्पादनात वाढ झाली आहे. इथेनॉल पुरवठा आणि त्याचे चांगल्या दराने पेट्रोलमध्ये संमिश्रण केले जात आहे. याकडे सरकारने अधिक लक्ष दिले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना ऑपरेटिंग मार्जिनमध्ये ७५-१०० अंकाच्या (बीपीएस) आधारावर या वर्षी १३ ते १४ टक्के वाढीली शक्यता आहे, असा निष्कर्ष क्रिसिल रेटिंग्जने काढला आहे.
क्रिसिलने दिलेल्या माहितीनुसार, याशिवाय, सरकारने अलीकडेच इथेनॉल-पेट्रोल मिश्रणाचे उद्दीष्ट २०२३ पर्यंत गाठण्याचे ठरवले आहे. यामुळे कमी कालावधीत गती चांगली राखण्यास याचा फायदा होईल.
याशिवाय, साखरेचा अतिरिक्त साठा गेल्या चार वर्षांच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये खालच्या स्तरावर म्हणजेच ९ ते ९.५ मिलियन टनापर्यंत येण्याची शक्यता आहे. परिणामी कारखान्यांना चांगला लाभ मिळणार आहे. आणि नियंत्रित कर्जाच्या स्तरातही सुधारणा होईल. क्रिसिल रेटिंग्जचे वरिष्ठ संचालक अनुज सेठी यांनी सांगितले की, चांगल्या किमतीवर इथेनॉलची विक्री तसेच उच्च साखर निर्यात या बाबी साखर कारखान्यांचा नफा वाढविण्यास फायदेशीर ठरणार आहेत.