साखरेच्या उत्पादनातील वाढ आणि अतिरिक्त स्टॉक यामुळे झिम्बावेच्या साखर निर्यातीत 21 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 1,20,000 टन साखर निर्यात केली होती, ज्याचे प्रमाण 2019 मध्ये वाढून 1,45,000 टनापर्यंत जावू शकेल.
यूरोपीय संघ, बोत्सवाना, अमेरिका, दक्षिण अफ्रीका आणि पूर्व अफ्रीका (केनया) या देशांना झिम्बावे कडून साखर निर्यात होते. 2018-19 चा टेरिफ रेट कोटा (टीआरक्यू) पूर्ण करण्यासाठी, झिम्बावे ने अमेरिकेला 17,443 टन कच्ची साखर निर्यात केली आहे. टीआरक्यू च्या अंतर्गत अमेरिकेने झिम्बावेला शुल्क मुक्त साखरेची अनुमती दिली आहे.
झिम्बावेसाठी अमेरिकेची बाजारपेठ चांगली आहे. गेल्या काही वर्षात कमी किमतीमुळे यूरोपीय संघाला साखर निर्यातीत घट झाली आहे.
काही महिन्यापूर्वी देंशात साखरेच्या कमी किमतींमुळे अफवा उठल्या होेत्या. याबाबत बोलताना झिम्बावे शुगर असोसिएनशचे अध्यक्ष, मुचुओदेई मसुंडा म्हणाले, राष्ट्राच्या आवश्यकतेएवढा साखरेचा स्टॉक देशात आहे. आमचा सर्वच व्यापार्यांना असा आग्रह आहे की त्यांनी जबाबदारीने व्यापार करावा. पुढच्या वर्षासाठी झिम्बावेमध्ये औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी लागणार्या साखरेचा पुरेसा स्टॉक आहे. झिम्बावेतील हिप्पो वैली एस्टेटस लि.आणि ट्रायंगल शुगर एस्टेटस लि. या दोन साखर कारखान्यांची संयुक्त साखर उत्पादन क्षमता जवळपास 6,40,000 टन आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.