महराजगंज : कोरोना काळात साखरा कारखान्यांनाही फटका बसला आहे. अपेक्षेपेक्षा कमी साखर उतारा आल्यामुळे अनेक कारखान्यांना तोटा सहन करावा लागला आहे. जिल्ह्यातील मुख्य असलेल्या आयपीएल सिसवा साखर कारखान्याचा साखर उतारा प्रती क्विंटल १०.८६ किलो आहे. गळीत हंगाम २०१९-२० मध्ये शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन मिळवून चांगला साखर उतारा दिला होता. यंदा मात्र तसे झालेले नाही.
सिसवा साखर कारखान्याने २०१९-२० मध्ये शेतकऱ्यांकडून २९ लाख ७७ क्विंटल ऊस खरेदी केला. त्यावेळी ११.०७ किलो प्रती क्विंटल उतारा मिळाला होता. त्यामुळे साखर कारखाना प्रशासन खुश झाले होते. मात्र, यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी उतारा मिळाला. यंदा कारखान्याने २३ लाख ६२ हजार क्विंटल उसाची खरेदी केली. मात्र, कारखान्याला १०.८६ किलो प्रती क्विंटल साखर उतारा मिळाला. तर जेएचव्ही गडौरा कारखान्याला प्रती क्विंटल ९.३० किलो साखर उतारा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी को ०२३८, को ०११८, को एल ९४१८४, को ९८०१४, कोएस ८२७२, को ८२७९, कोएस १४३४ आदी प्रजातीच्या उसाची लागण केली होती. चांगल्या प्रजाती असूनही जादा पावसामुळे पिकाचे नुकसान झाले.
शेजारी जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. कप्तानगंज साखर कारखान्याला ११.३० तर पिपराईच कारखान्याला ९ किलो प्रती क्विंटल साखर उतारा मिळाला आहे. गेल्या हंगामात महाराजगंजच्या शेतकऱ्यांचा ऊस चांगला होता. मात्र, यंदा अधिक पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे असे जिल्हा ऊस अधिकारी जगदीश यादव यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link