सातारा : फलटण तालुक्यातील शरयू शुगर या खासगी साखर कारखान्याने फेब्रुवारी महिन्यात तोडलेल्या उसाचे पैसे तब्बल पावणेदोन महिन्यानंतरही दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जिल्हा बँकेचे पीक कर्ज भरून शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ कसा मिळवायचा, असा प्रश्न उभा राहिला आहे. लाभापासून वंचित राहणार तर नाही ना? अशी चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
यंदा पुरंदर तालुक्यात आपला ऊस लवकर तोडला जावा यासाठी शेतकरी धडपडत होते. मात्र. सहकारी साखर कारखान्यास मोठ्या प्रमाणावर मजूर उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी शरयू साखर कारखान्याला ऊस दिला होता. मात्र, या कारखान्याकडून अद्याप शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले नसल्याने पीक कर्ज कसे भरायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. दरम्यान, शरयू कारखान्याकडून अविनाश भापकर यांनी सांगितले की, मंगळवारी, २ एप्रिल रोजी शेतकऱ्यांचे पैसे देण्यात येतील.