अक्कलकोट तालुक्यात साखर कारखान्यांनी थकवली एफआरपी, शेतकरी हवालदिल

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातून यंदा विविध साखर कारखान्यांना ६ ते ७ लाख टन ऊस गाळपासाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही कारखानदारांनी बिले दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कारखान्यांनी तातडीने ऊस बिले द्यावीत अशी मागणी केली जात आहे. काही कारखानदारांनी नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत बिल दिले असले तरी काहींनी तेसुद्धा दिलेले नाहीत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा बिलाकडे लागल्या आहेत.

तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ओंकार (तडवळ), रेणुका अफझलपूर, लोकमंगल लोहारा, कंचेश्वर, मुसनूर, आळंद, जयहिंद आचेगाव, सिद्धेश्वर सोलापूर, मातोश्री सददेवाडी, गोकुळ धोत्री या साखर कारखान्यांना पाठवला आहे. बहुतांश कारखान्यांनी २७०० ते २७५५ रुपये प्रती टन असे दर जाहीर केले आहेत. गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवली होती. यामुळे विहिरी, बोअरला पाणी नव्हते. बिकट परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर उसाला जपले होते. मात्र, आता त्याचे पैसे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकरी भीमाशंकर बिराजदार म्हणाले की, माझा ऊस डिसेंबरमध्ये गेला आहे. अद्याप बिल आले नाही. कारखानदार ऊस नेतात आणि बिल देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. शासनाने यासाठी कडक नियम केले पाहिजेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here