पुणे, ता. 8 : साखर आपल्या अर्थव्यवस्थेतेतील एक महत्वाचा घटक आहे, यात शंका नाही. पण आपल्याला प्रक्रिया उद्योगाकडे वळावेच लागेल. प्रक्रिया उद्योगातूनच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करता येईल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले.
पुणे येथे दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि मुंबई यांच्यावतीने आयोजित ‘साखर परिषदे’मध्ये ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, आज साखरेचे अधिक उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घटलेले दर अशा संकटाचा सामना करावा लागतो आहे. इथेनॉल निर्मितीसाठी वेगाने परवानगी दिली पाहिजे. यासाठी एका मंत्रिगटाची नियुक्ती करण्यात येईल. सर्व परवानग्या एक खिडकीच्या माध्यमातून देण्यासाठी यंत्रणा उभारली जाईल आणि ही परवानगी सेवा हमी कायद्यांतर्गत अंतर्भूत केली जाईल, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. साखर कारखान्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपला वाटा उचलला पाहिजे. गरीब रुग्णांची सेवा ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी राज्य बँकेच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी, माजी कृषीमंत्री शरद पवार, सहकार मंत्री श्री सुभाष देशमुख, बँक अधिकारी आणि साखर उद्योगातील अनेक नामवंत उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.