म्हैसूर : कर्नाटक सरकारने लॉकडाउनच्या नियामांत शिथिलता आणून साखर कारखान्यांच्या कामकाजाला परवानगी दिली आहे. तसेच जिल्हा प्रशासन अधिकार्यांनी साखर कारखान्यांचा दौरा केला आणि कारखाना व्यवस्थापनाला कर्मचार्यांचे सोंशल डिस्टसिंग आणि कोविड 19 च्या नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले. जिल्हा प्रशासनाने साखर कारखान्यांना सशर्त काम करण्याची परवानगी दिली आहे. चामराजनगर चे उपायुक्त एम.आर. रवी यांनी कुंठूर च्या जवळ बन्नी अम्मन साखर कारखान्याचा दौरा केला. परिसरामध्ये ऊस उत्पादकांच्या हितार्थ कारखान्याला काम सुरु करण्याची परवानगी दिली होती, ज्यामुळे ऊस शेतकर्यांना दिलासा मिळेल.
त्यांनी कारखान्यांमध्ये वापरले जाणारे साबण आणि सॅनिटायजर्स ची तपासणी केली आणि निर्देश दिले की, कर्मचार्यांची दैनिक तपासणी केली जावी आणि जर आवश्यक असेल तर आरोग्य तपासणीसाठी ही केली जावी. रवी यांनी सांगितले की, कर्मचार्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे आणि कारखाना परिसराच्या आत सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शारवण यांनी सांगितले की, ते सरकारच्या निर्देशांनुसार काम करत आहेत. रवी यांनी यालंदूर तालुक आणि कागलवाडी मध्ये एंबेल मध्ये गूळ प्लांटचाही दौरा केला आणि त्यांना उत्पादना दरम्यान स्वच्छता आणि सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.