मेरठ : यंदाच्या ऊस गळीत हंगामात जिल्ह्यातील साखर कारखाने लवकरच गाळप सुरू करणार आहेत. कारखाने सुरू करावेत असे निर्देश ऊस विभागाने कारखान्यांच्या व्यवस्थापकांना दिले आहेत.
याबाबत लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांनी सांगितले की, २८ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील सहा कारखान्यांचे कामकाज सुरू होईल. २८ ऑक्टोबर रोजी किनौनी कारखान्याचे गाळप सुरू होणार आहे. त्याबाबात कारखान्याच्या महा व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. कारखान्यापर्यंत ऊस पोहोचविणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले आहे. या पाठोपाठ दौराला, मवाना आणि नगलामल कारखाने सुरू होतील. तर ३१ ऑक्टोबर रोजी सकौती आणि मोहिउद्दीनपूर कारखान्याचे कामकाज सुरू होणार आहे. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांनी सांगितले की, कारखाना सुरू होण्यापूर्वी एक आठवड्यासाठी किती ऊस उपलब्ध आहे आणि किती उसाची गरज आहे, यानुसार ऊस तोडणीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.