कांपाला : अफ्रिकेतील केनिया आणि युगांडा या शेजारी देशांमधील सीमा भागात अनेक ऊस उत्पादक शेतकरी आहेत. सीमाभागातील ऊस आपल्याकडे खेचण्यासाठी साखर कारखान्यांमध्ये चढाओढ सुरू असते. त्यातूनच युगांडातील बुसिया शुगर इंडस्ट्री (बीएसआय) या साखर कारखान्यावर उसाच्या तस्करीचा आरोप करण्यात आला आहे. कारखाना व्यवस्थापनाने हा आरोप फेटाळून लावला आहे. कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी स्टेफेन सिआचिरे यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केले असून, स्थानिक करार झालेल्या शेतकऱ्यांचाच ऊस कारखान्यात गाळप केला जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, आमच्या कारखान्याशी करार केलेले काही ट्रॅक्टर्स हे केनिया सीमाभागातूनही उसाच्या फेऱ्या करत आहेत. त्याभागात आमचे ट्रक तसेच ट्रॅकर्स दिसल्यामुळे आमच्यावर सीमेपलिकडचा ऊस तस्करी करून घेतल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात कारखान्यावर आरोप केल्यानंतर कारखान्याकडून हा खुलासा करण्यात आला आहे. केनियाच्या ऊस असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस पिटर ओडिमा आणि बुसिया ऑउटग्रोवेर्स कंपनीचे संचालक लँबेर्ट ओगोची यांनी साखर कारखान्यावर सीमेपलिकडून ऊस तस्करी करून आणला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे. साखर कारखाना ऊस खरेदीमध्ये नियमावलीचे पालन करत नसल्याचा संशय आहे, असे ओदिमा यांनी म्हटले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.