सुल्तानपूर : बॉयलरमध्ये सातत्याने होत असलेल्या बिघाडामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या ४८ तासांमध्ये बॉयलर अनेकवेळा बिघडल्याने कारखाना सतत बंद पडला. मंगळवारी मध्यरात्री पुन्हा बॉयलर खराब झाला. त्यामुळे कारखान्याची चाके पुन्हा थांबली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गोसाईगंज विभागातील सैदपूर येथे असलेल्या जिल्ह्यातील एकमेव किसान सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम एक आठवड्याच्या विलंबानंतर सुरू झाले होते. त्यानंतर कारखान्याच्या गाळपाने वेग घेतला. मात्र, गेल्या दोन दिवसांत बॉयलरमधील बिघाडामुळे कारखाना अनेकवेळा बंद पडला. मंगळवारी रात्री खराब झालेल्या बॉयलरची दुरुस्ती पाच तासानंतर, सकाळी सहा वाजता पूर्ण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन थंडीत कुडकुडत कारखान्यात ऊस घेवून प्रतिक्षा करावी लागली. ऊस उत्पादक शेतकरी धीरज वर्मा, दीपनरायन वर्मा, कुलदीप, राजेन्द्र, राम अनुज सिंह आदींनी सांगितले की, येथे शेतकऱ्यांना थांबण्यासाठी काहीच व्यवस्था नाही. त्यामुळे खुप गैरसोयींना तोंड द्यावे लागले. एकूण १० लाख क्विंटलच्या अपेक्षित गाळपापैकी आतापर्यंत २.५ लाख क्विंटलचे गाळप झाले आहे.