आझमगड : अमिलो शेतकरी सहकारी शुगरमध्ये सध्या उसाचे गाळप सुरू आहे. अचानक टर्बाइनमध्ये बिघाड झाल्याने शनिवारी सायंकाळी सहा वाजता साखर कारखाना बंद पडला. बऱ्याच प्रयत्नानंतर दुरूस्ती करून पुन्हा गाळप सुरू करण्यात आले. यादरम्यान साखर कारखाना पाच तास बंद राहिला.
चालू हंगामात साखर कारखाना सुमारे ५५ तास बंद होता तर ९२५ तास सुरु होता आणि कारखान्याने १० लाख २७ हजार ५५० क्विंटल उसाचे गाळप पूर्ण केले आहे. साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२२-२३ चा प्रारंभ झाल्यापासून, शनिवारी संध्याकाळी ६ वाजता टर्बाईन बिघाडामुळे कामकाज बंद पडले. बऱ्याच प्रयत्नांनंतर पाच तासांनी पुन्हा रात्री अकरा वाजता कारखाना सुरू करण्यात यश आले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आतापर्यंत साखर कारखान्याने १० लाख २७ हजार ५५० क्विंटल उसाचे यशस्वी गाळप झाले आहे. त्यामुळे साखरेचे एकूण ६६ हजार क्विंटल उत्पादन झाले असून विजेचे उत्पादन ५१६० मेगावॅट झाले आहे. उसाचा रिकव्हरी दर ६.६५ टक्के असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुख्य व्यवस्थापक अनिल चतुर्वेदी यांनी आधी सांगितले की, साखर कारखाना बंद पडला नव्हता. मात्र पाच तास गाळप ठप्प होते ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यावर साखर कारखाना बंद असल्याचे त्यांनी मान्य केले.