साखर कारखान्यातील कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह

मुरादाबाद: नगर येथील स्टेशन रोडवर राहणार्‍या साखर कारखान्याचा अकाउंटंट कोरोना पॉजिटिव्ह आढळला. या सूचनेनंतर पोलिसांनी पूर्ण परिसराला सील करुन हॉटस्पॉट घोषित केले. याशिवाय त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे स्वॅब घेतले. त्या कर्मचार्‍याला मुरादाबाद च्या कोविड 19 च्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्टेशन रोड वर राहणारा युवक दीवान साखर कारखाना अगवानपूरमध्ये अकाउंटंट आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये ब्रेन हॅमरेज मुळे त्याला मुरादाबाद येथील कॉसमॉस हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे त्याचा स्वॅब कोरोना चाचणी साठी पाठवला होता. ज्याचा मंगळवारी पॉजिटिव्ह रिपार्ट आला. या सूचना मिळाल्यानंतर मंगळवारी पोलिसांसह आरोग्य अधिकार्‍यांनी पूर्ण परिसराला बैरिकेटींग लावून सिल केले. आरोग्य विभागाच्या टीम ने त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहेत, जेणेकरुन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येतील. याबरोबरच पूर्ण परिसराला सिल केल्यानंतर दुकानदारांना इशारा दिला की, त्यांनी हॉटस्पॉट परिसरातील दुकाने उघडू नयेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here