सहारनपूर : नानौता नगरातील किसान सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या तयारीची अचानक पाहणी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अर्चना द्विवेदी यांनी केली. यावेळी तयारी पूर्ण नसल्याने त्या कारखाना व्यवस्थापनावर संतप्त झाल्या. त्यांनी मुख्य व्यवस्थापक ललित कुमार यांना त्वरीत त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले.
कारखान्याच्या पाहणीवेळी परिसरात तसेच यार्डमध्ये पसरलेला कचरा पाहून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत त्वरीत सफाई करण्याचे निर्देश दिले. कारखान्याच्या परिसरातील आठ वजन काट्यांना वजन-मापे विभागाकडून प्रमाणपत्र जारी करण्यात आले नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. कारखान्यातील मशीनगरीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याबद्दल त्यांनी कारखाना व्यवस्थापनाला धारेवर धरत त्वरीत त्याची दुरुस्ती करण्यास सांगितले. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आवश्यक ते मॉकड्रील पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य व्यवस्थापक ललित कुमार यांना दिले. यावेळी जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहनमणी त्रिपाठी, सीसीओ धनीराम सिंह, सीए आर. के. पी. वरुण, चीफ इंजिनीअर संदीप गुप्ता, विशाल चौधरी आदी उपस्थित होते.