कूरेभार (सुल्तानपूर): जिल्ह्यातील एकमेव किसान सहकारी साखर कारखाना गुरुवारी तब्बल ३१ तासांनंतर सुरू झाला. गाळप सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री पॅनचा स्फोट झाल्याने कारखाना बंद पडला होता.
मंगळवारी मध्यरात्री साखर कारखान्यातील चार क्रमांकाच्या पॅनचा स्फोट झाला होता. त्यामुळे कारखान्यात गोंधळ उडाला होता. या अपघातातून पॅनमॅन आणि अन्य कामगार सुखरुप बचावले होते. पॅन फुटल्याने कारखान्यातील उसाचे गाळप बंद पडले होते. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत ऊस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. गाळप बंद पडल्याने कारखाना कार्यस्थळावर ऊस घेऊन आलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या रांगा लागल्या होत्या.
तब्बल ३१ तासानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पुन्हा गाळपास सुरुवात झाली. कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारखान्याचे सर व्यवस्थापक प्रताप नारायण यांनी पॅन फुटल्याने गाळप बंद झाले होते. दुरुस्तीनंतर आता सर्व सुरळीत झाले आहे असे सांगितले.