गोहाना : गोहाना-महम रस्त्यावरील चौधरी देवीलाल साखर कारखाना आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दहा टक्के अनुदानावर किटकनाशके उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या ऊस पिकावरील रोगांचे जलद नियंत्रण करावे यासाठी कारखान्याने हे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना कारखान्याच्या ऊस विभागाकडून किटकनाशके खरेदी करावी लागतील.
साखर कारखान्याचे ऊस विभाग प्रमुख मनजीत सिंह दहिया यांनी सांगितले की, कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दहा टक्के अनुदानावर किटकनाशके उपलब्ध होतील. त्याचा वापर करून उसातील लेपिडोप्टेरा आणि इतर किटकांचे नियंत्रण शेतकऱ्यांनी करायचे आहे.
कारखान्याकडे थेट कंपन्यांमधून किटकनाशकांची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची किटकनाशके उपलब्ध करून देण्यास कारखान्याचे प्राधान्य आहे. शेतकऱ्यांनी आपल्या उसाचे चांगले उत्पादन मिळावे यासाठी वेळेवर भांगलणी करावी. वेळेवर पाणी देण्यासह किटकनाशकांचा वापर करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.