मुरादाबाद : चंदनपूर येथील त्रिवेणी साखर कारखान्यात आग लागल्याने मोठी घबराट उडाली. खूप प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत सुमारे तीन ते चार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
टर्बाईनमध्ये आग लागल्याने कारखान्याचे गाळप दिवसभर बंद राहीले. त्यामुळे शेतकऱ्यांनाही खूप अडचणींना तोंड द्यावे लागले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा शोध सुरू आहे.
कारखान्याचे एचआर विभागाचे प्रमुख अमेज सिंह यांनी सांगितले की, सकाळी सुमारे नऊ वाजता टर्बाईनमध्ये आग लागली. अगदी थोड्याच वेळात ही आग सर्वत्र पसरली. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर कारखान्यातील आग प्रतिबंधक यंत्रणांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यानंतर सकाळी दहा वाजल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत कारखान्यातील गाळप बंद राहीले. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.