बूढनपूर, उत्तर प्रदेश: साखर कारखाना अजूनही चालू झाला नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकरी गव्हाच्या तयारीत आहेत. ज्यामुळे ते आपल्या उसाला कमी रेट वर गुर्हाळात घालत आहेत. तर साखर कारखाना व्यवस्थापन 21 नोव्हेंबर पासून चालू करण्याचा दावा करत होते. तांत्रिक बिघाडामुळे आतापर्यंत काऱखाना सुरु झालेला नाही.
उस शेतकरी साखर कारखाना चालू करण्याची मागणी बर्याच दिवसांपासून करत आहेत. ज्यामुळे ते वेळेत उस गाळप करु शकतील. पण नोव्हेंबर संपत आहे आणि साखर कारखाना सुरु झालेला नाही. यामुळे शेतकरी खूपच अडचणीत आहेत. तर अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, साखर कारखान्याच्या मशीनचा जो पार्ट खराब झाला आहे तो बंगलुरु येथून मागणवण्यात आला आहे. सामान आल्यानंतर कारखाना 28 नोंव्हेंबरपासून सुरु केला जाईल.
उस शेतकरी मीठू यांनी सांगितले की, कारखान्याकडून आम्हा शेतकर्यांचा उस खरेदी केला जात नाही. ज्यामुळे उस विकण्यामध्ये खूप अडचण येत आहे. गव्हाच्या लागवडीवर यामुळे परीणाम झाला आहे. जर वेळेवर कारखाना सुरु झाला नाही तर गव्हाचे पीक़ खराब होईल. आर्थिक स्तर वाढवण्यासाठी पारंपारित शेती सोडून उसाची शेती करणार्या शेतकर्यांना उस कारखाना न सुरु झाल्याने त्यांना आपला उस थातुरमातुर किमतीत विकावा लागत आहे. ज्यामुळे फायदा तर दूरच शेतकर्यांचे मूल्यही त्यांना मिळत नाही.