साखर कारखानदारीला आगामी काळात गतवैभव मिळेल : शहाजीराव भड

सोलापूर : राज्यात सध्या उसाचे क्षेत्र काही प्रमाणात घटले आहे. मात्र, हीच परिस्थिती कायम राहणार नाही. त्यात नक्कीच सुधारणा होईल. साखर उद्योगास पर्यायाने कारखानदारीस गतवैभव प्राप्त होईल, असे मत एस. एस. इंजिनिअर्स उद्योग समुहाचे प्रमुख शहाजीराव भड यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र घटले असले तरी अन्य राज्यात मात्र उसाचे क्षेत्र वाढलेले दिसून येते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. भड यांच्या साखर कारखाने उभारणीच्या क्षेत्रातील एस. एस. इंजिनीअर्स या कंपनीची कामे विविध राज्यांत प्रगतीपथावर आहेत.

भड म्हणाले की, मुळात कारखानदारीचे क्षेत्र हे निसर्गावर अवलंबून आहे. वाढत्या प्रदुषणामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. त्याची झळ कारखानदारी क्षेत्राला निश्चितपणे सोसावी लागते असे त्यांनी सांगितले. एस. एस. इंजिनिअर्स उद्योग समुहाने आता इथेनॉल क्षेत्रात पदार्पण केले आहे. कंचेश्वर शुगर धाराशिव व कृषीनाथ ॲग्रो, पारनेर आदी ठिकाणी प्लांट उभे केल्याचे त्यांनी सांगितले. शहाजीराव भड हे बार्शी तालुक्यातील गौडगांव येथील रहिवाशी आहेत. गेल्या ५० वर्षांपासून त्यांची कंपनी कारखादारीच्या क्षेत्रात कायरत आहे. एस. एस. उद्योग समूहाने आजवर विविध राज्यात तब्बल ४० साखर कारखान्याची उभारणी पूर्ण केली आहे. याशिवाय कंपनीकडून १२० बॉयलरची यशस्वीरित्या उभारणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here