डोईवाला साखर कारखान्याचे कर्मचारी आणि अधिकारी एप्रिल आणि मे महिन्याचा पगार न मिळाल्याने अडचणीत आहेत. शनिवारी डोईवाला साखर कारखान्याचे अकाउंटन्ट अशोक अरोडा यांनी सांगितले की, एप्रिल महिन्याचा कारखाना कर्मचार्यांचा जवळपास 2 करोड 80 लाख रुपये पगार देणे आवश्यक आहे. तर मे महिन्याचाही एक करोड 95 लाख इतका पगार साखर कारखान्यावर देय आहे. हा पगार पीएफ सहित आहे. साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2 मे पर्यंत चालू होता, त्याच दरम्यान सर्व मजूर कामावर होते, पण आता मात्र 196 कर्मचारीच कार्यरत आहेत. कारखान्याच्या मजूर संघटनेचे अध्यक्ष गोपाल शर्मा यांनी सांगितले की, जर लावकरात लवकर त्यांचा पगार दिला नाही, तर सर्व कर्मचारी यूनियनला आंदोलन करावे लागेल. कारखान्याचे निदेशक मनमोहन सिंह रावत म्हणाले, एक महिन्याचा पगार एका आठवड्याच्या आत दिला जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.