शेतकऱ्यांच्या ऊस बिलानंतरच साखर कारखाना कामगारांना मिळणार डीए

घोसी : उत्तर प्रदेशातील सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांना जुलै ०२१ पासून देय असलेला महागाई भत्ता आताच मिळण्याची शक्यता नाही. उत्तर प्रदेश सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक अतुल खन्ना यांनी २४ साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ११७२.९१ कोटी रुपयांची थकबाकी जमा केली आहे. त्यानंतर या कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना डीए दिला जाण्याबाबत पत्र जारी केले आहे.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, सहकारी साखर कारखाना व आसवनी कर्मचारी संगाचे प्रांतीय अध्यक्ष कालू राम यांनी जनसुनावणीशी संबंधीत पोर्टलवर हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्य व्यवस्थापकांनी हा प्रश्न निकाली काढला आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची स्थिती आहे. अशा प्रकारचे पाऊल पहिल्यांदाच उचलले गेल्याचे साखर कारखाना कामगारांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना उसाचे पैसा आणि कर्मचाऱ्यांचे वेतन या दोन्ही बाबी वेगवेगळ्या घटकातून दिल्या जातात असा दावा कामगारांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here