हरियाणा मध्ये 2 ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उपोषण

चंडीगढ़, हरियाणा: नारायणगड साखर कारखान्याने ऊसाचे पैसे देण्यास उशीर केल्याने भारतीय किसान युनियन (रतन मान) यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दोन शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. बीकेयू ब्लॉक अध्यक्ष नरपत राणा आणि जिल्हाध्यक्ष जसमेरसिंग यांनी हे उपोषण सुरू केले आहे.

नरपत राणा म्हणाले, “ऊस उत्पादकांना दरवर्षी त्यांची देयके निकाली काढण्यासाठी आंदोलन करणे भाग पडते. या हंगामातील आतापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त रक्कम थकित आहे. आमची नियमित व लवकर देयकाची मागणी पूर्ण होईपर्यंत हे उपोषण सुरु राहील.”

दरम्यान, भारतीय किसान युनियन (चारुणी) देखील या विषयावर महासभा घेणार आहे. कारखान्याने आपली थकबाकी वेळेवर न भरल्याने युनियनने गेल्या महिन्यात महापंचायतीची हाक दिली होती.

एसडीएम अदिती म्हणाल्या की, “24 डिसेंबरपर्यंतची देयके मंजूर झाली होती आणि या आठवड्यात डिसेंबरची देयके दिली जातील, शेतकऱ्यांची मने वळवण्याचे आम्ही प्रयत्न केले पण ते त्यांच्या मागणीवर ठाम राहिले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

SOURCEChinimandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here