रोहतक : रोहतक कारखान्याची साखर आता एक आणि पाच किलोच्या छोट्या पॅकींग मध्ये मिळणे सुरू झाले आहे. कारखाना व्यवस्थापनाने सांगितले की, आता याचे उत्पादन ट्रायल साठी केले जात आहे. साखर कारखाना भाली आनंदपूर रोहतक चे प्रधान संचालक मानव मलिक यांनी सांगितले की, कारखान्याने बाजारातील मागणी पाहून पाच व एक किलोच्या पॅकिंग मध्ये साखरेचे ट्रायल पध्दतीने उत्पादन सुरु केले आहे. लवकरच बाजारात रोहतक कारखान्याची साखर छोट्या पँकिंग मध्ये उपलब्ध होईल. ज्याची गुणवत्ता खाजगी साखर कारखान्यांपेक्षा चांगली असेल. साखर कारखान्याने इक्षु नावाने साखरेच्या पॅकेटचे उत्पादन केले आहे. सॅशे मध्ये साखरेचे उत्पादन करणारा रोहतक कारखाना हरियाणा राज्यातील पहिला साखर कारखाना असेल. ते शुक्रवारी झालेल्या एका बैठकीत बोलत होते. साखर कारखाना रोहतक बोर्डाची बैठक कारखाना चेअरमन व उपायुक्त आर एस वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ज्यामध्ये कारखान्याच्या गेल्या गाळप हंगामातील उपलब्धतता तसेच कारखान्याला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी भविष्यात काय योजना असाव्यात यावर विचार मंथन करण्यात आले. त्यांनी सांगितले की, साखर कारखान्याने 2019-20 हंगामात चांगली कामगिरी केली. कारखान्याच्या 2019-20 गाळप हंगामाचा शुभारंभ 4 डिसेंबरला सहकारमंत्री डॉ. बनवारीलाल यांच्या हस्ते करण्यात आला होता . कारखान्यामध्ये 30 एप्रिल पर्यंत एकूण 149 दिवसात 45.91 लाख क्विटल ऊस गाळप करण्यात आले. ज्याचे एकूण देय 155 करोड़ 98 लाख 70 हजार रुपये इतके आहे. कारखान्याकडून आतापर्यंत शेतकऱ्यांना 122 करोड़ 36 लाख 38 हजार रुपये शेतकऱ्यांचे भागवले आहेत, जे एकूण देयाच्या 78.44 टक्के आहे. साखर कारखाना रोहतक, हरियाणा प्रदेश च्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांना भागवण्यात आलेल्या थकबाकी मध्ये पहिल्या स्थानावर आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.