पाकिस्तानात साखर आयात प्रक्रिया सुरू

कराचीः स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने (एसबीपी) सोमवारी बँकांना 0.2 दशलक्ष टन पांढर्‍या साखरेच्या आयातीसाठी प्रक्रिया सुरू करण्याचा आणि आयातदारांसाठी काही अटी घालण्याचा सल्ला दिला. एसबीपीने सांगितले की ज्यांना वाणिज्य मंत्रालयाकडून परवानगी आहे त्यांना साखर आयात करण्याची परवानगी दिली जाईल.

24 ऑगस्ट रोजी उद्योग आणि उत्पादन मंत्री हम्माद अजहर म्हणाले, होते की एकदा साखरेची आयात झाली की साखरेचे दर मोठ्या प्रमाणात कमी होतील. ज्यामुळे महागाईने पीडित लोकांना मोठा दिलासा मिळेल. त्यांनी असा दावा केला की देशात साखर आयात झाल्यानंतर देशांतर्गत साखर साठेबाज देखील खुल्या बाजारात आपला साठा सोडण्यास सुरवात करतील ज्यामुळे साखरेचे दर आणखी कमी होतील. आयातीच्या बातमीनंतर साखरेचे दर आधीच घसरले आहेत. मंत्री म्हणाले की, पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here