तेहरान : सध्याच्या इराणी वर्षानुसार पहिल्या आठ महिन्यात म्हणजेच मार्च ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ईराणच्या साखर आयातीत गेल्यावर्षी समान कालावधीच्या तुलनेत १२ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. इराणच्या सरकारी व्यापार महामंडळाच्या (जीटीसी) एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
वितरण आणि विक्री समन्वयाचे (जीटीसी) महासंचालक होर्जत बरत अली यांनी सांगितले की, आठ महिन्यात ७,५८.००० टन साखर आयात करण्यात आली आहे. देशांतर्गत उत्पादनात वाढ झाल्याने आयातीत घसरण झाली आहे. देशांतर्गत उत्पादन आणि आयातीमुळे देशातील साखर साठ्याची स्थिती खूप चांगली आहे.
इराणला भारताकडून साखर निर्यात केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या स्तरावर चांगले संबंध आहेत.