लखनौ : गेल्या सहा वर्षांमध्ये साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण करून त्यांना एकीकृत शुगर कॉम्प्लेक्समध्ये बदलण्यात आले आहे. साखर उद्योगाने उत्तर प्रदेशचे चित्र बदलले असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. यामुळे राज्य देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य म्हणून आघाडीवर आले आहे. असे ते म्हणाले. राज्यातील साखर उद्योगाला १२० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादनामुळे उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी आता पंतप्रधानांचे धोरण स्वीकारून आणि सर्वाधिक प्रमाणात इथेनॉल उत्पादन करून ‘हरित ऊर्जे’च्या स्त्रोताच्या रुपात देशात ओळख मिळवली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, गेल्या काही दशकात ज्या पद्धतीने साखर कारखाने बंद होत होते, त्यामुळे शेतकरी निराश झाले होते. २०१७ पर्यंत ते पळून जात होते. आदित्यनाथ म्हणाले की, गेल्या सहा वर्षात डीबीटी (प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण) च्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १ लाख ९७ हजार कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत.
ते म्हणाले की, आज राज्यात १०० साखर कारखाने असे आहेत की, जे ऊस खरेदी केल्यानंतर १० दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देतात. हा एक मोठा बदल आहे असे सांगत त्यांनी इतर कारखान्यांना या पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ऊस तोडणी पावती ही आता काहीच समस्या उरलेली नाही. अडचणी आता समाप्त झाल्या आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ४५ लाखावरुन ६० लाखांवर गेली आहे. उसाचे उत्पादन वाढले आहे आणि क्षेत्रफळही वाढले आहे. आदित्यनाथ म्हणाले की, जेव्हा COVID महामारीवेळी देशातील सर्व उद्योग बंद होते, तेव्हा उत्तर प्रदेशातील साखर कारखाने सुरू होते. दरम्यान, यावेळी मुख्ममंत्र्यांच्या हस्ते साखर उद्योगाच्या १२० वर्षांच्या प्रवासावर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले.