नवी दिल्ली : देशातील उसाचे वाण सुधारण्यासाठी भारतीय साखर उद्योगाकडून गुंतवणूकीत वाढ करण्यात आली आहे. उपलब्ध उत्पादन आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडून (ISMA) एकत्र करण्यात आलेल्या आकडेवारीच्या आधारानुसार, यामुळे उसाची उत्पादकता खूप प्रमाणात वाढू शकते. ISMA च्या म्हणण्यानुसार, ऊस संशोधन संस्थांसोबत यासाठी संयुक्तरित्या काम केले जात आहे. जे ऊसाचे वाण विकसित केले जातील, ते जास्त उत्पादन देऊ शकतील. हे उसाचे वाण दुष्काळ प्रतिरोधक, कीड प्रतिरोधक आणि पावसाळ्यातील कोणत्याही अनियमिततेला तोंड देण्यास सक्षम असतील. देशात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे देशात ऊस आणि साखर उत्पादन वाढविण्यासाठी उच्च इथेनॉल उत्पादन क्षमता, अधिक डिस्टिलरी, अनुकूल सरकारी धोरणांची गरज आहे.
दक्षिण भारताील काही खास वाणांची माहिती उपलब्ध झाली असून ते कमी पाण्याच्या वापरातूनही चांगले उत्पादन देवू शकतात. याशिवाय ISMA ऊसाचे उत्पादन वाढविणे आणि पाण्याचा कमी वापर करण्यासाठी विकसित काही उत्पादने आणि वाणांचे मूल्यांकन करीत आहे. चांगल्या ऊसामुळे साखर उत्पादनही वाढेल आणि त्यापासून जादा साखरेला इथेनॉल उत्पादनाकडे वळविण्यात येईल. यातून देशाला सहजपणे, कोणत्याही अडथळ्याशिवाय २० टक्के इशेनॉल मिश्रण आणि त्यापुढील टप्पा गाठण्यास मदत मिळेल. याशिवाय, जून महिन्यात ISMA, सरकार, साखर उद्योग, इंधन वितरण कंपन्या (OMCs) आणि सोसाइटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल कंपनीजच्या (SIAM) प्रतिनिधींसह एक टीम इथेनॉल मिश्रण तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी ब्राझीलला गेली होती. टीमने ब्राझीलमध्ये कसे इथेनॉल उत्पादनात क्रांती आणण्यासह पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनिय सुधारणा केली आहे, याची माहिती घेतली. ब्राझीलमध्ये जवळपास ९० टक्के वाहने फ्लेक्सिबल (FFV) आहेत आणि सरासरी ५६ टक्के मिश्रण आहे.