शेतकरी आणि देशाच्या विकासात साखर उद्योगाची मोठी भूमिका : योगी आदित्यनाथ

लखनौ : साखर उद्योगाने शेतकरी आणि देशाच्या विकासात खूप मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शुक्रवारी साखर कारखानदार असोसिएशनच्यावतीने उत्तर प्रदेशातील साखर उद्योगाच्या स्थापनेला १२० वर्षे झाल्याच्या निमित्ताने इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी साखर उद्योगाची गौरवशाली विकास यात्रा सांगणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले.

ते म्हणाले की, आमचे सरकार शेतकऱ्यांचे हित जपणारे आहे. आणि आमच्यासाठी शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च आहे. सरकार सत्ते आल्यानंतर शेतकऱ्यांची थकीत बिलांची समस्या संपुष्टात आली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी सरकारने हरेक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मुख्यमंत्री योगी आपल्या भाषणात म्हणाले की, राज्यात जवळपास ६० लाख शेतकरी ऊस पिकाशी जोडले गेले आहेत. साखर कारखानेही मजबुतीने पुढे जात आहेत. गेल्या सहा वर्षांमध्ये आमच्या सरकारने जवळपास १,९७,००० कोटी रुपयांची ऊस बिले थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here