पुणे : साखर उद्योगाने आपल्या अंतिम उत्पादनाच्या किमतीच्या आधारावर इथेनॉल आणि साखर यांमध्ये बदल करण्यासाठी हायब्रीड उत्पादन मॉडेल स्वीकारले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बोलत होते. सलग दुसऱ्या वर्षी कोविड २९ मुळे सर्वसाधारण सभा ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. पवार म्हणाले की, ब्राझील सारख्या प्रमुख साखर उत्पादक देशांनी हायब्रीड मॉडेल स्वीकारले आहे आणि किमतींच्या आधारावर इथेनॉल आणि साखर ही उत्पादने ते बदलत राहतात.
भारतात जवळपास ३०५ लाख टन साखर उत्पादन होते. जर आपण साखर निर्यातीबाबत विचार केला तर उद्योगाकडे पुरेशी साखर आहे. त्याचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी केला पाहिजे.
पवार म्हणाले की, केंद्र सरकार इथेनॉल उत्पादनास आक्रमकपणे प्रोत्साहन देत आहे. उद्योगाला आपले स्वतःचे अर्थशास्त्र टिकवून ठेवण्यासाठी यात सहभाग घेता आला पाहिजे.