कटियाल, हरयाणा: सहकारी साखर कारखान्याने २०२१-२२ या हंगामातील गळीत हंगामाच्या तयारीचे कार्यकारी संचालकांनी आढावा घेतला. अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
कार्यकारी संचालक सतेंद्र सिवाच यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले की, कारखान्याने आगामी गळीत हंगामात ४५ लाख क्विंटलहून अधिक उसाच्या गाळपाचे लक्ष्य ठेवले आहे. सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच अनावश्यक खर्चात कपात करावी. सर्वांच्या सहकार्यामुळे कारखान्याने आधीच्या गळीत हंगामात राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक कौशल्याचा पुरस्कार मिळवला आहे. राज्य स्तरावर कॅथल कारखाना सर्वोत्तम असल्याचे जाहीर झाले आहे.
कारखान्याने सुरू केलेल्या बगॅस प्लांटच्या क्षमतेनुसार ब्रिक्टचे उत्पादन घेतले जाईल. गुळाच्या प्लांटमधून उच्च प्रतीचा गूळ आणि साखरेचे उत्पादन करण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मशिनरीची चाचणी घेतली आहे. २७ ऑक्टोबर रोजी बॉयलर पूजन केले जाईल.
यावेळी कमलकांत तिवारी, अभियंता लवलेश कुमार, रामफल शर्मा, अवनिंद्र कुमार, किरण कुमार, सत्यजीत लाल आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.