सठियांव : सठियाव साखर कारखान्याने ऊस पुरवलेल्या १६ हजार २९६ शेतकऱ्यांना ९६ कोटी ७७ लाख ४८ हजार रुपयांची ऊस बिले दिली आहेत. बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येऊ लागले आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील असे सांगण्यात आले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शंभर टक्के बिले अदा केली आहेत. कारखान्याने २५ नोव्हेंबर २०२२ रोजी गाळप सुरू केले होते. १३ मार्च २०२३ अखेर एकूण १०६ दिवस हंगाम सुरू राहिला. कारखान्याने २८ लाख ४१ हजार क्विंटल ऊस गाळप केले. आता सर्व बिले मिळाल्याने शेतकरी खुश आहेत. कारखान्याचे महाव्यवस्थापक अनिल कुमार चतुर्वैदी यांनी सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले.
दरम्यान, मऊ कारखान्याकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७७.३६ टक्के तर बालिया कारखान्याने ९७.०२ टकके ऊस बिले दिली आहेत. सठियांव कारखान्याने सर्व बिले दिली असून उर्वरीत बिलेही लवकरच दिली जातील असे जिल्हा ऊस अधिकारी अशर्फीलाल यांनी सांगितले.