मनीला (फिलीपींस ): फिलीपींस च्या बुकिद्नोन मध्ये असणाऱ्या दोन प्रमुख साखर कंपन्यांनी कोरोना वायरस च्या प्रकोपामुळे अस्थायी रूपाने गाळप बंद केले आहे. बुस्को शुगर मिलिंग आणि क्रिस्टल शुगर कंपनी ने 28 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत काम बंद केले आहे.
बुस्को शुगर मिलिंग चे प्रभारी अधिकारी एडुअर्ड वी. कार्लोस म्हणाले कि, बुकिद्नोन चे गवर्नर जोस मारिया ज़ुबीरी जूनियर यांच्या सांगण्यावरुन कारखाना बंद केला आहे. हा उपाय देशात कोरोना वायरस चा प्रसार थांबवण्यासाठी केला आहे. कार्लोस ने स्पष्ट केले की, त्यांची साखर रिफाइनरी मध्ये उत्पादन क्षमता स्थिर झाली आहे. 6 एप्रिलला ऑपरेशन सुरु होईल आणि 21 मे पर्यंत ऊसाचे पीक संपून जाण्याची शक्यता आहे. 30 मार्च पर्यंत बुकिद्नोन प्रांतात कोणतेही कोरोनोवायरस प्रकरण आढळून आलेले नाही.