तांत्रिक खराबीमुळे साखर कारखाना 20 तास बंद

तांत्रिक खराबीमुळे साखर कारखाना 20 तास बंद

शामली : गाळप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात सुरु असणारा शामली साखर कारखाना तांत्रिक कारणामुळे आलेल्या खराबीमुळे 20 तास बंद राहीला. यामुळे रस्त्यांवर ऊसांनी भरलेल्या वाहनांची रांग लागली.

शामली साखर कारखान्यामध्ये गुरुवारी दुपारी दोन वाजता अचानक बॉयलर मधील तांत्रिक खराबी आली होती. ज्यामुळे साखर कारखाना बंद झाला आणि शेतकर्‍यांना ऊसाचे वजन करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली. जवळपास 15 तास चालेल्या दुरुस्तीनंतर शुक्रवारी सकाळी पाच वाजता कारखाना सुरु झाला. पण एक तासानंतर पुन्हा बॉयलर मध्ये तांत्रिक खराबी आल्यामुळे तो बंद झाला. यानंतर पुन्हा दुरुस्ती सुरु झाली. कारखाना बंद झाल्यामुळे कारखाना रोडपासून हॉस्पीटल रोड आणि हनुमान रोड वर ऊस वाहनांची रांग लागली. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत लॉकडाउन मध्ये सूट दिल्या दरम्यान बाजार खुला होण्याची वेळ निर्धारीत आहे. त्याच वेळी कारखाना बंद राहिल्यामुळे रस्त्यांवर ऊस वाहनांची रांग लागल्यामुळे लोकांना ये जा करण्यात अचडण निर्माण होत आहे. गर्मीमुळे शेतकरीही अडचणीत आहेत. शामली साखर कारखान्याचे जीएम केन कुलदीप पिलानिया यांनी सांगितले की, कारखान्याच्या बॉयलरमध्ये तांत्रिक खराबी असल्यामुळे कारखाना बंद झाला होता. दुरुस्तीनंतर सकाळी 11 वाजता कारखाना सुरु झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here