साखर कारखान्याच्या कंत्राटदाराची आत्महत्या

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. संबंधित शेतकरी तेरणा सहकारी साखर कारखान्याचा कंत्राटदार होता. दिलीप शंकर ढवळे (वय ५५) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीते तेरणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उस्मानाबादचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जबाबदार धरले आहे. मात्र, ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला असून, ढवळे यांच्या आत्महत्येस बँक जबाबदार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, ढवळे यांच्या चिठ्ठीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही उल्लेख आहे.

ढवळे यांनी त्यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह झाडावरून खाली उतरवताना ढवळे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात आत्महत्येचे कारण लिहिण्यात आले होते. त्यात लिहिले होते की, ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि विजय दंडनाईक यांनी सातबारा बँकेत गहाण ठेवून चार एकर जमिनीवर बोजा चढवण्यास सांगितले होते. त्या जमिनीचा तीनवेळा लिलाव करण्याचा प्रयत्न केला. माझी बदनामी झाली. सततचा दुष्काळ आणि माझी झालेली फसवणूक यामुळे मी आत्महत्या करत आहेत. याप्रकरणी मी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण, ओमराजेंनी ती भेट होऊ दिली नाही, असेही ढवळे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here