घोसी : स्थानिक तहसील अंतर्गत बडागाव येथील दि किसान सहकारी साखर कारखाना लिमिटेडचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. गळीत हंगाम प्रारंभ मऊचे जिल्हाधिकारी अमित सिंह बंसल यांच्या हस्ते पुरोहीत योगेंद्र नाथ मिश्र आणि जीवन उपाध्याय यांच्याकडून वैदिक मंत्रोच्चार आणि हवन करून करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी हैबतपूर येथील शेतकरी जगधारी मरछू यांच्या ऊसाची ट्रॉलीतील उसाचे काट्यावर वजन केले. उसाची मोळी क्रशरमध्ये घालून हंगामास प्रारंभ करण्यास आला.
किसान सहकारी साखर कारखाना लिमिटेड घोसीकडून २०२१-२२ या हंगाात २२ लाख क्विंटल गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, ऊसाचे क्षेत्र कमी असल्याने आणि पाऊस तसेच पुरात पिक नष्ट झाले असल्याने यावेळी हे उद्दीष्ट गाठणे अवघड वाटत आहे. दरवर्षी गाळप उद्दीष्ट पूर्तीपूर्वीच कारखाना बंद करण्यात येतो.
गळीत हंगामाच्या प्रारंभ प्रसंगी सुमारे १०० हून अधिक ऊसाच्या ट्रॉली घेऊन शेतकरी आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमित सिंह बंसल, घोसीचे उप जिल्हाधिकारी सुरेश कुमार, क्षेत्र अधिकारी नरेश कुमार, तहसीलदार पी. सी. लाल, उपसभापती रामाश्रय राय, सर व्यवस्थापक लालता प्रसाद सोनकर, मुख्य अभियंता के. के. सिंह, रामश्रय, सुरेंद्र कुमार, मुख्य ऊस अधिकारी राम सेवक यादव, लेखाकार सुनील कुमार राय, मानवी सिंह, सुजीत कुमार सिंह, राजमंगल यादव, आनंद चौधरी, राम शरण राय, शिवाकांत मिश्रा, नीरज सिंह, शंकर सुमन राय, विजय राय आदी उपस्थित होते.