हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
सिद्धनाथ साखर कारखान्यावर आयुक्त कार्यालयाने ‘आरआरसी’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि सुमारे 1 लाख 24 हजार 615 क्विंटल साखर जप्त करण्यात आली, 2018-2019 च्या हंगामात शेतकऱ्यांच्या एफआरपी चे रुपये देण्यास कारखाना अपयशी ठरला आहे.सन 2018-2019 हंगामासाठी साखर कारखान्यांना ऊस शेतकऱ्यांना 33 कोटी रुपये दिले नाहीत.
याआधी, जे कारखाने एफआरपी देण्यास अपयशी ठरले आहेत अश्या 17 साखर कारखान्यांना महाराष्ट्र साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नोटिस पाठविल्या आहेत आणि कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर सात साखर कारखान्यानी एफआरपी दिली आणि अनेकांनी सॉफ्ट लोन मंजूर झाल्यानंतर एफआरपी भरण्याचे आश्वासन दिले होते. पण सिद्धनाथ साखर कारखाना ऊसाची परतफेड करण्यास अयशस्वी राहिला.
म्हणूनच 23 मे रोजी सिद्धनाथ साखर कारखाण्याच्या विरोधात ‘आरआरसी’ अंतर्गत साखर आयुक्त कार्यालयाने कारवाईचा आदेश दिला होता. बुधवारी उत्तर सोलापूर ताहसीलदार कार्यालयाकडून कारवाई केली गेली.