सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कृष्णा कारखाना कर्जातच : इंद्रजीत मोहिते

कराड : सत्ताधाऱ्यांनी आज पर्यंत राजकारण करण्यापलीकडे काहीच केले नाही. सन २००९-१९ या तब्बल एक दशकाची सत्ता हातात असणाऱ्या दोन्हीही गटांच्या नेत्यांनी कृष्णा साखर कारखाना वाचवण्याच्या दृष्टीने काहीच केले नाही. या अक्षम्य दुर्लक्षामुळे कारखाना कायम कर्जातच राहिला. शिवाय कारखान्याच्या माध्यमातून नव उद्योग निर्मितीची परंपराही खंडीत केल्याची, खंत कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी व्यक्त केली. तसेच नव उद्योग निर्मिती आणि विस्तार न झाल्यामुळे हजारोंचे संसार उध्वस्त झाले आहेत, याला कारखान्याचे संचालक मंडळ जबाबदार असल्याची टिका ही त्यांनी यावेळी केली.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. इंद्रजित मोहिते बोलत होते. ते म्हणाले, कारखान्यातील अनेक सभाासदांना कारखान्याच्या ६३ व्या वार्षिक सभेची नोटीस मिळालेेली नाही. शिवाय नोटीसीमध्ये अक्रीया शील सभासदत्वाचा विषय नमूद केलेला नाही. कारखान्याची तोडणी वाहतूक अजूनही विस्कळीत आहे. त्यामध्ये गटांतटांचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे सामान्य सभासद त्रस्त आहे. असंख्य मृत सभासदांच्या वारसांना जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले, यशवंतराव मोहिते यांचा दि. ०७/०१२/२०१९ रोजी जन्मशताब्दी कार्यगौरव समारंभ रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे होणार आहे. हा कार्यक्रम माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आदींच्या उपस्थितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here