स्योहारा : उत्तर प्रदेशातील सरकारच्या सक्रियतेमुळे जिल्हा ऊस अधिकारी सतर्क आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करताना, राज्यातील ऊस अधिकार्यांनी साखर कारखान्यातील वजन केंद्रांमधील वजनकाट्यांची तपासणी करणे सुरु केले आहे. यावेळी तिथे उपस्थित अधिकार्यांशी बोलताना भारतीय शेतकरी यूनियन चे प्रतिनिधींनी शेतकर्यांबरोबर ऊस केंद्रांवर येणार्या अडचणी सांगितल्या. जिल्हा ऊस अधिकार्यांनी ऊस समितीच्या विशेष सचिवांना या अडचणी दूर करण्याचे आदेश दिले.
या तक्रारीवरुन डीसीओ यशपाल सिंह यांनी वजन काट्याबराबेरच कम्प्युटरही तपासला. वजनकाट्यांबाबत त्यांना मिळालेली माहिती खोटी होती. याबाबत त्यांनी शेतकर्यांना दिलासा देवून तुमच्या ऊसाचे वजन योग्य पद्धतीने होत असल्याचे सांगितले. भारतीय शेतकरी यूनियन चे ब्लॉक अध्यक्ष चौधरी गजेंद्र सिंह टकैत यांनी डीसीओ ना ऊस कैलेडर, ऊस सट्टामध्ये असणार्या काही दोषांबाबत सांगितले. डीसीओ नी ऊस समिती चे सचिव नरेश यांना हे दोष ताबडतोब दूर करण्यास सांगितले. ज्या शेतकर्यांचे सट्टे बंद करण्यात आले आहेत, ते पुन्हा सुरु करुन दिले जावेत, अशा सूचनाही दिल्या. डीसीओंच्या आश्वासनामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला.